You are currently viewing पुरवठा निरीक्षक पदभरती २०२३ शासन निर्णय; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
पुरवठा निरीक्षक पदभरती २०२३ शासन निर्णय; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

पुरवठा निरीक्षक पदभरती २०२३ शासन निर्णय; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

  • Post category:Home

पुरवठा निरीक्षक भरती शासन निर्णय येथे पहा

पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीची निवड करणेबाबत तसेच समन्वय अधिकारी यांची नेमणूक करणेबाबत….. महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग दिनांक :- १७ मे, २०२३. रोजी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्याची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.

सरळ सेवा भरती २०२३ साठी वित्त विभागाकडून निर्बंध शिथिलता

शासन निर्णय, वित्त विभाग दि.३१.१०.२०२२ अन्वये पदभरतीवरील निर्बंधामध्ये शिथिलता देऊन ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तद्नुषंगाने उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने या विभागाच्या शासन निर्णय दि.१८.४.२०२२ अन्वये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील पदांचा आढाव्याअंती सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे.

पदभरती साठी पुढील प्रमाणे नियम आहेत

सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना यापुढे स्पर्धा परिक्षा टी.सी.एस., आय.ओ.एन व आय. बी. पी. एस. या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पुरवठा निरीक्षक व लिपिक भरती साठी आय.बी.पी.एस. कंपनी निवड

त्यानुसार पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयाच्या अधिपत्याखालील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत राबविण्याची तसेच भरती प्रक्रिया राबविण्याकरीता समन्वय अधिकारी यांची नेमणूक करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पुरवठा निरीक्षक भरती शासन निर्णय :

प्रस्तावनेत नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन, सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार असून, सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आय. बी. पी. एस. कंपनीची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. विभागीय आयुक्त यांच्या अधिनस्त पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद विभागीय सवर्ग पद आहे. पदभरतीमध्ये एकसूत्रता राहणे आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी.

३-तसेच, पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी, समन्वय व अनुषंगीक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी खालील समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. – उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग, नवी मुंबई

४. सदर भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने आय.बी.पी.एस. कंपनीसोबत सामंजस्य करारनामा (MOU) करण्यासाठी उप आयुक्त (पुरवठा), कोकण विभाग, नवी मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

पुरवठा निरीक्षक भरती शासन निर्णय येथे पहा