तलाठी भरती २०२३ नवीन शासन निर्णय प्रसिद्ध; talathi bharti 2023

तलाठी भरती २०२३ नवीन शासन निर्णय प्रसिद्ध; talathi bharti 2023 राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि.३१/०८/२०२३ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत. महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. अस्थायी – २०२३/प्र.क्र.५१/ई-१० मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- १० मे २०२३

सविस्तर शासन निर्णय येथे पहा

तलाठी भरती २०२३ सरळ सेवा बद्दल अपडेट

या शासन निर्णया मध्ये अस्थायी पदे जी आहेत त्यांना मुदत वाढ दिली आहे. परंतु रिक्त पदांपैकी जी सरळसेवेने पदे भरली जाणार आहेत, ती पदे वेगळी आहेत. त्या बद्दल जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

प्रास्ताविक:- तलाठी भरती २०२३

शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण- १००२/प्र.क्र.६६ (भाग-२)/ई-८, दि. २०/०३/२००६ अनुसार क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार संपुर्ण राज्यासाठी तलाठी संवर्गाची एकूण १२६३७ मंजूर पदे होती. तथापि, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात दोन तालुका एक उपविभाग समायोजनाच्यावेळी करवीर उपविभागाकडील १ तलाठी पद व्यपगत झाले. तसेच राज्यातील उपविभागाची पुनर्रचनेनुसार कोकण विभागात सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उपविभाग कणकवली-१ व उपविभाग सावंतवाडी-१ अशी २ पदे कमी झालेली आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत आता जुन्या आकृतिबंधानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची मंजूर पदांची संख्या १२६३४ अशी आहे.

सदर मंजूर पदांपैकी ४०५९ पदे ही अस्थायी आहेत. सदर अस्थायी पदांना संदर्भाधीन शासन निर्णय क्र. २ दि. ११/१०/२०२२ अन्वये दि.०१/०९/२०२२ ते दि.२८/०२/२०२३ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदरची मुदत संपुष्टात आली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या अखत्यारितील अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि.३१/०८/२०२३ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व अमरावती यांनी तलाठी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे, सदर पदांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

१-संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी ८५७५ पदे स्थायी असून, उर्वरित ४०५९ पदे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०५९ अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र- अ मधील स्तंभ क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांनी संदर्भ क्र. ४ वरील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी..

४. शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि. ०८/०२/२०२३ अन्वये सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५१०१२१५५९४६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

सरळसेवा भरती तलाठी नवीन जाहिरात बद्दल सद्यस्थिती

तलाठी स्थायी व अस्थायी पदांची माहिती

image 5
image 6
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!