जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्यामध्ये 14 संवर्गातील एकूण 4,497 पदांची जाहिरात आली आहे. त्यासाठी 3 नोव्हेंबर 2023 पासून 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन एप्लीकेशन जलसंपदा विभागाच्या या wrd.maharashtra.gov.in/ वेबसाईटवर करता येणार आहेत. यामध्ये विविध क आणि ब ची पद आहेत.[read more]
जसे की वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब, निम्नस्त्रेणी लघुलेखक गट ब, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक आलेख, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेख, दप्तर कारकून, मोजणी, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदांसाठी वयोमर्यादा देखील देण्यात आलेली आहे ज्यामध्ये खुल्या प्रवर्गाला 18 ते 40 वर्षापर्यंत व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षापर्यंत.
यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये इतके असणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा तुमची घेतली जाणार त्याचा डिटेल मध्ये सिल्याबस प्रसिद्ध झालेला आहे. सिल्याबस पाहण्यासाठी खालील लिंक वरती तुम्ही क्लिक करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी देखील खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे.
[/read]