
zilla parishad gram sevak bharti जिल्हा परिषद वेळापत्रक- जिल्हा परिषद अंतर्गत २०१९ मध्ये ग्रामसेवक या पदांची त्याचबरोर इतर पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मागील काही दिवसात २०१९ ची पूर्ण जिल्हा परिषद परीक्षा रद्द करून ग्राम विकास विभागाने आज वेळापत्रक व नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे . यामध्ये ग्रामसेवक या पदांचा हि समावेश असेल आणि अंगणवाडी सेविका , विस्तार अधिकारी कृषी , लिपिक विस्तार अधिकारी , स्थापत्य अभियंता , स्थापत्य अभियंता साह्यक या पदांचा समावेश असेल. त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हा परिषद भरती २०२२ नवीन वेळापत्रक –
zilha parishad bharti 2022 new timetable for group c posts like – Junior Engineer civil , Gram Sevak contractual, Extension Officer ( agriculture) , Civil Engineering Assistant , Live Stock Supervisor ( Animal Husbandry department), Senior Assistant (Account) , Supervisor ( anganvadi sevika) ICDS, Senior Assistant Ministerial, Junior Account Officer.
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य
- ग्रामसेवक कंत्राटी
- विस्तार अधिकारी (कृषी)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- लाइव्ह स्टॉक पर्यवेक्षक (पशुसंवर्धन विभाग)
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- पर्यवेक्षक (अंगणवाडी सेविका) ICDS
- वरिष्ठ सहायक
- कनिष्ठ लेखाधिकारी
वरील गट क पदांची जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती केली जाईल याची नव्याने जाहिरात फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होईल व परीक्षा एप्रिल २०२३ मधील होतील , परीक्षा offline अथवा online जिल्हा निवड मंडळ व जिल्हा परिषद मार्फत ठरवल्या जातील , हि पदभरती करताना रिक्त पदांच्या 80% पदे वित्त विभागाच्या आदेशानुसार आकुर्तीबंध अंतिम झाल म्हणून भरली जातील अंतिम झाला असता तर १००% पदे भरता आली असती. सविस्तर वेळापत्रक खाली दिले आहे.
जिल्हा परिषद भरती वेळापत्रक गट क पदांचे आरोग्य विभाग सोडून

Gramsevak (ग्रामसेवक) जिल्हा परिषद भरती माहिती
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक हे पद भरले जाते , यामध्ये २०२२ साठी नवीन जाहिरात एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध होईल , या साठी १२ वी पास पात्रता लागते त्याचबरोबर सविस्तर पात्रता तुम्ही खालीप्रमाणे पाहू शकता.
ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेतील ग्रामविकास खात्याचा वर्ग ३ ( गट क ) चा सेवक असून मोठ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास ग्रामसेवक अधिकारी असे संबोधले जाते. एका ग्रामपंचायतीसाठी एक अथवा एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो.
ग्रामसेवक ( gram sevak)
पात्रता-
- महाराष्ट्राचा रहिवासी
- १२ वि उत्तीर्ण ६०% गुण घेऊन ( किंवा हि पात्रता नसल्यास अभियांत्रिकी पदवी, किंवा BSW किंवा कृषी विषयाची पदवी,संगणक हातळणी)
पगार ग्रामसेवक किती असतो –
ग्रामसेवक पगार – जिल्हा निधी मधून दिला जातो (तसेच ग्रामसेवकांना ५२००-२०२०० + ग्रेड वेतन रु.२४०० व १२ वर्षांच्या सेवेनंतर किंवा पदोन्नतीने ५२००-२०२०० + ग्रेड वेतन रुपये ३५०० ही वेतनश्रेणी देण्यात येईल. विद्यमान वेतनश्रेणीनुसार ग्रामसेवकांना सात वर्षांच्या सेवेनंतर रुपये २८०० हे देण्यात येणारे ग्रेडवेतन रद्द करण्यात येईल.)
(कंत्राटी ग्रामसेवक पगार जिल्हा निधी मधून दिला जातो – ६००० रु मानधन व कायमस्वरूपी प्रवासभत्ता ११०० रु भत्ता – हा कंत्राटी ग्रामसेवक पगार आहे जो २०१९ च्या जिल्हा परिषद भरती जाहिरात मध्ये प्रसिद्ध झाला होता )

महाराष्ट्रातील व ग्रामसेवकांची प्रशिक्षण केंद्रे
- जालना
- परभणी
- बुलढाणा गारगोटी (कोल्हापूर )
- मांजरी (पुणे)
- सिंदेवाडी (चंद्रपूर )
- कोसबाड (पुणे)
- अमरावती
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक हे पद भरले जाते त्यासाठी खालीप्रमाणे अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इंग्रजी , मराठी , general knowledge, तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी या विषयातील एकूण १०० प्रश्न व २०२२ गुणाची परीक्षा ९० मिनटात द्यावी लागते . या साठी नकारात्मक गुण कमी होत नाहीत.
