zilla parishad recruitment 2019 Maharashtra exam date announced by gov all details are given in this blog post.
jilha parishad bharti 2019 and 2021 exam GR
माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट – क संवर्गातील पदभरती बाबत . महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग.
मार्च , २०१ ९ महाभरती अंतर्गत जिल्हा परिषद पदभरतीबाबत १० मे , २०२२ च्या शासन निर्णयान्वये सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी ● पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे . सदर शासन निर्णयान्वये ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे .
पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच या बाबतच्या परिक्षा पारदर्शक व निः पक्षपाती पणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , सातारा यांच्या अध्यक्षेते खाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता . याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती बाबत परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात शासनास सदर परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केला आहे . सदर शिफारशीस अनुसरून माहे मार्च , २०१ ९ व माहे ऑगस्ट २०२१ अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अत्यारितील गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परीक्षेबाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच इतर सुचना कळविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती .
मार्च , २०१ ९ व माहे ऑगस्ट , २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ( वेळापत्रक ) पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे .