You are currently viewing जिल्हा परिषद भर्ती पुढे गेली; सविस्तर माहिती

जिल्हा परिषद भर्ती पुढे गेली; सविस्तर माहिती

Zp exam postponed

www.majinoukriguru.in/Zp-exam-postponed

माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट – क संवर्गातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत .

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग . शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०२० / प्र.क्र.९९ / आस्था ८ , बांधकाम भवन , २५ , मर्झबान पथ , मंत्रालय , मुंबई ४००००१ . दिनांक : २८ जून , २०२१ .

शासन परिपत्रक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट – क संवर्गातील माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतचा संदर्भाधीन क्र .१ येथील शासन निर्णय दिनांक १४ जून , २०२१ व संदर्भ क्र .३ येथील शासन शुध्दिपत्रक दिनांक २२.६.२०२१ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . त्यास अनुसरुन परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी दिनांक १५.६.२०२१ व दिनांक २५.६.२०२१ च्या पत्रांन्वये सूचना देण्यात आल्या आहेत .

२ . सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास ( एसईबीसी ) प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचा लाभ देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक २३.१२.२०२० रोजी निर्गमित केला आहे . मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ५.५.२०२१ रोजी झालेल्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास ( एसईबीसी ) प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे . त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास ( एसईबीसी ) प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रुपांतरीत झाल्याने माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामध्ये बदल होत आहे . तसेच , अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचे प्रमाण काही कालावधीसाठी १० टक्केवरुन २० टक्के केल्यामुळे व जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व कारणांस्तव प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षणनिहाय जागांमध्ये बदल होत आहे . सदर बदलांनुसार पदभरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे . यासाठी काही अधिकचा कालावधी लागणार आहे .

त्यामुळे दिनांक १४.६.२०२१ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र – ब मधील नमूद वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदनिहाय जाहिर प्रकटन , दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करुन उमेदवारांना दिनांक १ जुलै , २०२१ पासून मे.न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांच्याद्वारे www.maharddzp.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन / रि – रजिस्ट्रेशन करणे शक्य होणार नाही .

त्यामुळे दिनांक १४.६.२०२१ च्या शासन निर्णयातील विवरणपत्र – ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार परीक्षेची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही . ३ . उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता , दिनांक १४.६.२०२१ च्या शासन निर्णयातील विवरणपत्र – ब मध्ये नमूद केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांकडून जाहिर प्रकटन / दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलल्यामुळे नव्याने वाढ झालेल्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करणे वेळापत्रकानुसार शक्य नसल्याने याबाबतची कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे .

शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र – ब मधील नमूद परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करुन सुधारित वेळापत्रक शासन स्तरावरुन लवकरच कळविण्यात येईल .

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०६२८१६४२४५७८२० असा आहे . सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , ४ .