You are currently viewing जिल्हा परिषद भरती २०२३ अपडेट; jilha parishad bharti latest update 2023
जिल्हा परिषद भरती २०२३ अपडेट; jilha parishad bharti latest update 2023

जिल्हा परिषद भरती २०२३ अपडेट; jilha parishad bharti latest update 2023

जिल्हा परिषद भरती २०२३ अपडेट (ZP bharti)

Zilha parishad bharti 2023 Update – जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये गट ‘क’ या पदांची जाहिरात ‘महापरीक्षा’ पोर्टल मार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या वेळी एकूण १३५०० पदांचा समावेश होता. २०१९ मधील या १३५०० पदामध्ये – आरोग्य विभाग मधील (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,औषध निर्माता , प्रयोगशाळा टेक्निशियण , आरोग्य पर्यवेक्षक ) या पदांचा समावेश होता. त्याचबरोबर गट क मधील ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, अंगणावाडी पर्यवेक्षिका , साह्यक, पशुधन साह्यक , अभियंता असा अनेक पदांचा समावेश होता.

परंतु कोविड परिस्थिमुळे सर्वच परीक्षा घेणे शक्य झाले नाही आणि जिल्हा परिषद परीक्षा देखील होऊ शकल्या नाहीत. जिल्हा परिषद परीक्षा पुढे जाण्याचे अजून एक महत्वाचे कारण होते न्यासा कंपनी . कारण हीच कंपनी मार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग मधील गट क व ड पदांच्या देखील परीक्षा घेतल्या जात होत्या आणि त्या परीक्षा व्यवस्थित पार नाही पडल्या त्यामुळे हि कंपनी अपात्र ठरली परीक्षा घेण्यासाठी. व जिल्हा परिषद चे परीक्षा घेण्यासाठी ठरवण्यात आलेले पहिले वेळापत्रक रद्द झाले पुढे पोस्टपोंड करण्यात आले . तेव्हा पासून जिल्हा परिषद भरती साठी २०२२ मध्ये तीन वेळेस वेळापत्रक काढण्यात आलो परंतु एकदा हि परीक्षा झाल्या नाहीत.

ग्रामविकास विभागाने २०१९ मधील परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार परीक्षा २०१९ मधील अर्ज पूर्ण पणे रद्द केले गले आणि नवीन शासन निर्णया नुसार प्रसिद्ध केले कि २०१९ मधील ज्या अर्जदारांनी फी भरली आहे ती पुन्हा दिली जाईल . परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची काहीच कार्यवाही विभागाकडून करण्यात आली नाही आहे.

आता नवीन वेळापत्रकानुसार २०२३ मधील जानेवरी फेब्रुवारी महिन्यात जाहिरात येणे अपेक्षित होते मात्र , कुठलीच जाहिरात आली नाही त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. जसे कि कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम नाही , तेवढे परीक्षा केंद्र उपलब्ध नाहीत , त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. आणि शासकीय महाविद्यालय मधील संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली जाणर आहे. परंतु हि कार्यवाही लवकर होताना दिसत नाही.

जिल्हा परिषद भरती २०२३
जिल्हा परिषद भरती २०२३