(जिल्हा परिषद भरती) Zilha parishad 2019 bharti New GR– Zilha parishad 2019 bharti for 13000 vacancy various posts new government decision. माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट – क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय १० मे , २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे .ZP Recruitment 13514 Posts – Zilla Parishad Bharti 2019 exam will be announce soon. for zp bharti 2019 advertisement pdf you can visit official website maharddzp.com
Zilha parishad bharti 2019 Exam
सार्वजनिक आरोग्य विभाग , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले आहेत . तथापि , ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक ही पदे आरोग्याशी संबंधीत असल्याने राज्यात कोविड -१ ९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व इतर साथ रोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने वित्त विभागाने जिल्हा परिषदांमधील माहे , मार्च , २०१ ९ मध्ये दिलेल्या जाहिरातीमधील केवळ आरोग्य विभागाशी संबंधीत ५० % रिक्त पदांची पदभरती करण्यास मान्यता दिलेली होती .

शासन निर्णय Zilha parishad bharti 2019 GR
मार्च , २०१ ९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे .
१. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे ग्रामविकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून , ही सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे .
२ . जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी . सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती ( DATA ) व परिक्षा शुल्क अनुक्रमे मे . न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. व उप आयुक्त ( आस्थापना ) , विभाग आयुक्त कार्यालय , कोकण विभाग , नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यावे .
३. माहे मार्च , २०१ ९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत , त्याच उमेदवारांची परिक्षा घेण्यात यावी . यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येवू नयेत किंवा नव्याने जाहिराती देण्यात येवू नयेत .
४ . जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित पदे वगळता इतर संवर्गातील पदांबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्र .२७ वरील शासन निर्णयातील सूचनांनुसार जिल्हा परिषद / पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याकरिता विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन , सुधारित आकृतिबंध ( मंजूर पदांचा तपशील ) अंतिम करून शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी तात्काळ पाठविण्यात यावा . सदर सुधारित आकृतिबंधास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर वित्त विभागाच्या संदर्भ क्र . ३ व २७ वरील व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र .२८ वरील शासन निर्णयातील सूचनांनुसार इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात यावी .