जिल्हा न्यायालय अकोला ; पुस्तक बांधनी, पदांची भर्ती २०२२
जिल्हा न्यायालय अकोला आस्थापने वरील पुस्तक बांधणीकार ‘ या पदाकरीता उमेदवारांची निवड / प्रतिक्षा यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . २ . उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच ( आर.पी.ए.डी ) किंवा शीघ्र डाक सेवा ( स्पीड पोस्ट ) पोच पावतीसह द्वारे पुस्तक बांधणीकार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , अकोला यांच्याकडे दिनांक २५/०४/२०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
जाहीरात दिनांक : ०५/०४/२०२२
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : २५/०४/२०२२
पुस्तक बांधणीकार पदसंख्या :
निवड यादीसाठी पदांची संख्या ०२ > प्रतिक्षा यादीसाठी पदांची संख्या २
भर्ती बद्दल माहिती खलीलपर,प्रमाणे
आवश्यक पात्रता : –
उमेदवार हा १ ) माध्यमीक शालांत ( S.S.C. ) परीक्षा उत्तीर्ण असावा . ( २ ) औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधुन पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असावा . ३ ) उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रीक व व्यवसायीक माहिती असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा :
१८ ते ३८ सर्वसाधारण व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षा पेक्षा जास्त नसावा.
पुस्तक बांधणीकार कामाचे स्वरूप :
निवड झालेल्या उमेदवारास अकोला जिल्हा न्यायिक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात पुस्तक बांधणीकार या पदावर नियुक्ती दिली जाईल . नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांची बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणा – या फाईल्स , नोंदवहया इत्यादी ची बांधणी करणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागतील . त्याच प्रमाणे पुस्तक बांधणीकार हे अधिकारी यांचे निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील .
वेतनश्रेणी :
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस ५ या सुधारित वेतन संरचनेत रूपये १८,०००-५६९ ०० / – व नियमा नुसार देय भत्ते .
उमेदवारांकरिता सुचना :
उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाण पत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत . उमेदवाराने त्याचे / तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र ( फोटो ) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की , स्वाक्षरीची सुरूवात छायाचित्रावर करून तिचा काही भाग छायाचित्राबाहेर येईल .
पुस्तक बांधणीकार निवड प्रक्रिया
१) २० गुणांची पुस्तक बांधणी कामाची मुल्यमापन परीक्षा घेण्यात येईल .
२) पुस्तक बांधणीकार पुस्तक बांधणी कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्ते नुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल .
अर्ज फी –
कार्यालयाने या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही .
अर्ज पाठवण्याची प्रक्रिया-
प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , अकोला येथे नोंदणीकृत डाक पोच ( आर.पी.ए.डी ) किंवा शीघ्र डाक सेवा ( स्पीड पोस्ट ) पोच पावतीसह द्वारे अर्ज येथे पहा
संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाइट येथे पहा