You are currently viewing NHM अंतर्गत राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावरील पदभरती बाबत सुचना जाहिरात

NHM अंतर्गत राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावरील पदभरती बाबत सुचना जाहिरात

  • Post category:Home

NHM अंतर्गत राज्‍य व जिल्‍हा स्‍तरावरील पदभरती बाबत सुचना जाहिरात– विद्यार्थी मित्रांनो तुम्ही १५ फेब्रुवारी २०२२ ला प्रसिद्ध झालेल्या nhm राज्य व जिल्हा स्तरावरील अंतगर्त भरती साठी अर्ज केला असल्यास तुमच्यासाठी महत्वाची सूचना प्राप्त झाली आहे खालीलप्रमाणे .

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई महाराष्ट्र अंतर्गत राज्यस्तरावरील विविध रिक्त पदांची जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई महाराष्ट्र अंतर्गत जिल्हास्तरावरील विविध रिक्त पदांची जाहिरात

nhm bharti 2022

खालील प्रमाणे NHM भरती बद्दल सूचना .

अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी . ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे . अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची स्वसाक्षांकित प्रत सादर करावी . ” असे स्पष्ट नमूद करण्यात येऊन देखील बहुतांश उमेदवारांनी सदरचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केलेले नाही .

त्यामुळे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया करण्यात येत असून त्यामध्ये गुणांकन यादी तयार करण्यास विविध अडचणी निर्माण होत आहेत . वरील जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की ज्या उमेदवारांनी अर्जासोबत ग्रेड अथवा अन्य श्रेणीचे गुणांच्या टक्केवारीमध्ये रुपांतर करण्याबाबतचे संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही.

अशा उमेदवारांनी

दि .१२.०५.२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सदरचे प्रमाणपत्र nhmrecruit.objection@gmail.com या ईमेलवर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून सादर करावे . दि .१२.०५.२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त होणा – या प्रमाणपत्र / प्राप्त ईमेल विचारात घेतले जाणार नाहीत व त्या उमेदवारांचे अर्ज बाद / रद्द करण्यात येतील , याची कृपया नोंद घ्यावी . उपरोक्त पदभरतीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित होणा – या सुचना , याद्या इत्यादी करीता www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळास नियमीत भेट द्यावी .

सूचना येथे पहा