पशुसंवर्धन विभाग भरती २०२३
राज्यामध्ये पशुसंवर्धन विभाग मध्ये पदभरती कधी केली जाणार व सध्या काय प्रक्रिया सुरु आहे त्याबद्दल आज तारांकित प्रश्न मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता त्याची माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेली भरती साठी पुन्हा नव्याने अर्ज मागवले जाणार आहेत. ज्यामध्ये २०१७ व २०१९ ची भरतीचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभाग गट क सरळसेवा भरती परीक्षा
पशुसंवर्धन विभाग मधील पदभरती पूर्ण केली जाणार आहे त्यासाठी ,शासनाने दोन कंपनी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी IBPS हि कंपनी सरळसेवा भरती पशुसंवर्धन विभाग मधील गट क ची पदे भरणार आहे.
पशुसंवर्धन विभाग ची परीक्षा online होणार आहे
पशुसंवर्धन मधील गट क ची परीक्षा online प्रकारे केली जाणर आहे ज्यामध्ये IBPS कंपनी द्वारे परीक्षा होईल. ह्या मध्ये वाढीव पदांचा देखील समावेश केला जाणार आहे.