
जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) ( ZILLA PARISHAD AURANGABAD RECRUITMENT OF VARIOUS POSTS 2023 POSTWISE COUNT ) मध्ये एकूण ४३२ पदासाठी एकूण १८४८२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या मध्ये पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.
Post Name | Received Applications |
---|---|
GRAMSEVAK (CONTRACTUAL) | 2233 |
AUXILARY NURSE MIDWIFE [HEALTH WORKER (FEMALE)] | 1631 |
HEALTH WORKER (MALE) | 1360 |
HEALTH WORKER (MALE) (SEASONAL SPRAYING FIELD WORKER) | 1975 |
PHARMACY OFFICER | 1761 |
LABORATORY TECHNICIAN | 147 |
EXTENSION OFFICER (AGRICULTURE) | 226 |
SENIOR ASSISTANT | 281 |
LIVE STOCK SUPERVISOR | 324 |
SENIOR ASSISTANT (ACCOUNTS) | 84 |
JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS) | 226 |
JUNIOR ASSISTANT | 2073 |
SUPERVISOR | 2147 |
JUNIOR ENGINEER (CIVIL) (WORKS/RURAL WATER SUPPLY) | 2807 |
CIVIL ENGINEERING ASSISTANT (CIVIL) (WORKS/MINOR IRRIGATION) | 1122 |
STENOGRAPHER (HIGHER GRADE) | 85 |
औरंगाबाद जिल्हा परिषद भरती २०२३ साठी किती अर्ज आलेत त्याची माहिती PDF येथे पहा- Click here download
Golden Opportunity to Join ZP Aurangabad: Apply Now for Various Vacancies!
जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) ४३२ पदे Zilha parishad aurngabad bharti 2023 –Are you looking for an exciting career opportunity in the administrative sector? Zilha Parishad Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) has announced a recruitment notification for numerous vacancies. This blog will provide all the essential details you need to know about the positions, eligibility criteria, application process, and important dates. Don’t miss this chance to be a part of the esteemed Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) administration. Read on to find out more!
जिल्हा परिषद भरती २०२३
रिक्त पदे – आरोग्य सेवक ५०% पुरुष, आरोग्य सेवक ४०% पुरुष, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट (औषध निर्मता), ग्रामसेवक कांत्राटी, कनिष्ठ अभियंता सिव्हिल (ग्रामीण पाणी पुरवठा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, अंगणवाडी पर्यवेक्षक, यांत्रिकी, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी स्टॅटिक्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( बांधकाम व लघुपाठबंधारे).
एकूण रिक्त पदे – 432 जागा
वय मर्यादा – १८ ते ४० वर्ष खुला प्रवर्ग , १८ ते ४५ वर्ष राखीव प्रवर्ग
अर्ज प्रक्रिया – online
अधिकृत website – https://aurangabadzp.gov.in
परीक्षा – online
अर्ज फी – खुला प्रवर्ग १०००रु आणि ९०० रु राखीव प्रवर्ग
जिल्हा परिषद अर्ज करण्याची तारीख – अर्ज सुरुवात ५ ऑगस्ट २०२३ ते २५ ऑगस्ट २०२३
प्रवेश पत्र ( Zilha parishad exam hall ticket ) – परीक्षेच्या ७ दिवस अगोदर
ZP Aurangabad Recruitment 2023 Details:
- Available Vacancies: 432
- Positions:
- Arogya Sevak
- Arogya Sevika
- Pharmacist
- Contract Gram Sevak
- Junior Engineer (Civil)
- Junior Accounts Officer
- Junior Assistant (Clerk)
- Junior Assistant Accounts
- Joiner
- Supervisor
- Livestock Supervisor
- Laboratory Technician
- Senior Assistant (Clerk)
- Senior Accounts Assistant
- Extension Officer (Agriculture)
- Stenographer (Higher Grade)
- Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Eligibility Criteria:
To apply for these positions, candidates must meet the following criteria:
- Age Limit:
- Open category candidates: 18 to 40 years
- Reserved category candidates: 18 to 45 years
- Application Fees:
- Open category: Rs. 1000/-
- Reserved category: Rs. 900/-
- Ex-servicemen candidates: No fees
Application Process:
Interested and eligible candidates should submit their applications online through the official website of ZP Aurangabad at https://aurangabadzp.gov.in/. The application mode is entirely online, so ensure you have a stable internet connection before proceeding.
Important Dates:
- Starting Date for Application: 5th August 2023
- Last Date for Application: 25th August 2023
Make the most of this opportunity by completing your application before the deadline.
Stay Updated with Majinoukriguru.in:
For the latest updates on ZP Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2023 and Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023, visit our website Majinoukriguru.in. We keep our content up-to-date with the most relevant information regarding Zilha Parishad Aurangabad Recruitments. You can find all the necessary details here: https://majinoukriguru.in/zilla-parishad-aurangabad-bharti/
Important Links ZP Bharti 2023
Don’t let this golden opportunity pass you by! Join the ZP Aurangabad team and become a part of the prestigious Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) administration. Check out the official website for further information and submit your application before 25th August 2023. Remember, your future awaits at ZP Aurangabad!
Official Website | ZP Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) |
Notification PDF | Click Here |
Apply Online | Click here apply |
Zilha parishad bharti syllabus 2023
Zilha Parishad Bharti pune has announced recruitment for the year 2023, and the application process will commence from 5th August 2023 and continue until 25th August. The ZP Bharti exam will be conducted through the online mode CBT (Computer-Based Test) by the IBPS company. The syllabus for the Jilha Parishad Bharti has been announced and can be found below. For all the latest updates on Zilha Parishad Bharti, please refer to the information provided below.
- जिल्हा परिषद ग्रामसेवक अभ्यासक्रम येथे पहा ( Gramsevak syllabus)
- zilha parishad exam pattern
- Zilha Parishad Bharti 2023: Exam Pattern and Syllabus
ZP bharti arogya sevak patrata
आरोग्य पर्यवेक्षक –
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउदेशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन ९० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्याचा | मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेवक (महिला)
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
औषध निर्माण अधिकारी
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार.
कंत्राटी ग्रामसेवक
किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यू) किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे)
स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
विद्युत अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार.
कनिष्ठ आरेखक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत आतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार.
कनिष्ठ यांत्रिकी
ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेवर किंवा तेलावर चालणारे (रोड रोलर) दुरूस्त करणे इत्यादींचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव असेल असे उमेदवार
कनिष्ठ लेखाधिकारी
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शाख व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल, याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनभव असणान्यास अधिक पसंती दिली जाईल.
कनिष्ठ सहाय्यक लिपिक
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार , परंतु उक्त दोन भाषांपैकी कोणत्याही एका भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार, नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत दुसऱ्या भाषेतील दर मिनीटास ३० शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार
कनिष्ठ सहाय्यक लेखा
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण | झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यानी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
जोडारी
जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील , ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडायचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
तारतंत्री
महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसन्या वर्गाचे प्रमाणपत्र किया तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
पर्यवेक्षिका
ज्यांनी पदवी धारण केली आहे असे महिला उमेदवार
पशुधन पर्यवेक्षक
- (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा
- (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुचन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (व श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती.
- (१)त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
- (२) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषि विद्यापीठे यानी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम
- (३) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यानी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शाखामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि),
- (४) खालील संस्थानी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम.
(एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ किंवा राज्यातील विविध विधीक कृषी विद्यापीठे किंवा (दोन) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठे किंवा
- (५) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
- (ब) ज्यामुळे नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायीच्या पर्यवेक्षणाखाली व निदेशनाखाली किरकोळ पशुवैद्यकिय सेवा करण्याचा हक्क असेल अशी, भारतातील कोणत्याही पशुवैद्यक संस्थेची पदविका किया प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती.
- परंतु किरकोळ पशुवैद्यकीय सेवा करण्याचा त्यांना हक्क मिळवून देणा- या पदविकेचा किंवा प्रमाणपत्राचा धारक भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ (१९८४ चा ५२ याच्या कलम ३० च्या खंड(ख) च्या परंतुकातील स्पष्टीकरणान्वये व कलम ५७ अन्वये कृषि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात काढलेल्या क्र आयव्हीसी १००६ प्रक्र ५३२/पदुम-४ दि २७ ऑगस्ट २००९ च्या अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या किरकोळ पशुवैद्यकिय सेवाच देण्यास हक्कदार असेल (तीन) माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)
यांत्रिकी
शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी अथवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतीही अर्हता असावी (तीन) त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील तांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. वरील उपखंड (दोन) व तीन मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता संपादन केल्यानंतर त्यास ऑटोमोबाईल व न्यूमेटिक मशीनच्या देखभाली व दुरूस्तीचा १ वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा, (पाच) तो जड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना धारक असावा. परंतू विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही असाधारण अर्हता किंवा असाधारण अनुभव किया दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या | शिफारशीनुसार शिथील करू शकेल.
रिगमन (दोरखंडवाला)
शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा जड वाहन कामाचा चैव परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा चालविण्याचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा, ज्यांच्याकडे विधन यंत्राद्वारे खुदाईचा २ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य
वरिष्ठ साह्यक लिपिक
पदवी
वरिष्ठ साह्यक लेखा
संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शाख व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवाराना अधिक पसंती दिली जाईल.
विस्तार अधिकारी कृषी
ज्यानी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना प्राधान्य.
विस्तार अधिकारी (शिक्षण)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकटा पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वा शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्याना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणान्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
विस्तार अधिकारी (पंचायत)
जे उमेदवार विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.