talathi bharti 2023; ३११० नवीन पदांची मंजुरी शासन निर्णय

वैद्यकीय शिक्षण भरती शुद्धीपत्रक PDF new

पुरवठा निरीक्षक भरती शासन निर्णय येथे पहा

तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेल्या तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: प्राफेन-२०१० (तलाठी)/प्र.क्र. ११२.

प्रस्तावना:-

महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करून शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी संदर्भीय क्रमांक १ वरील शासन निर्णय, दिनांक ०३.०२.२०१४ व शासन शुध्दीपत्रक दिनांक १८.०२.२०१४ अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now

तलाठी साझा पुनर्रचना समितीने मंत्रिपरिषदेला दि.२६/०४/२०१६ रोजी सादर केलेला अहवाल व अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी मा. मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतिम निर्णयार्थ सादर करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानुषंगाने संदर्भीय क्रमांक ३ वरील शासन निर्णय दिनांक १६.५.२०१६ अन्वये मा.मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमं उपसमितीने अहवाल मंत्रीमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी दिनांक १६.०५.२०१७ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील तलाठी साझाची पुनर्रचना करुन महसूली विभागनिहाय नवीन तलाठी साझे व महसूली मंडळे स्थापन करण्यास व सदर कार्यालये कार्यान्वित करण्यासाठी अनुक्रम संदर्भाधिन क्र. ८ व ९ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली.

एकूण नवीन पदे

मा. मंत्रीमंडळाच्या दि. १६.०५.२०१७ च्या बैठकीतील निर्णयानुसार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तलाठी साझे व मंडळ कार्यालयासाठी एकूण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि. २८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूल मंडळ कार्यालयासाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

तलाठी भरती पुणे जिल्हा रिक्त पदे

पुणे महसूल विभाग साठी पुणे जिल्हा मध्ये – पुणे ३३१ जागा, सातारा -७७ , सांगली -५२, सोलापूर -१११, कोल्हापूर -३१ एकूण ६०२ जागा नव्याने मंजूर करण्यात आल्या आहेत.

image 15

अमरावती महसूल विभाग तलाठी भरती रिक्त पदे

अमरावती तलाठी भरती २०२३ मधील नव्याने मंजूर पदे – अमरावती – ३४, अकोला -८ , यवतमाळ -५४,बुलढाणा -१० , वाशीम 0, एकूण – १०६ पदे.

image 16

नागपूर तलाठी भरती २०२३

image 17

छत्रपती संभाजी नगर

image 18

नाशिक महसूल विभाग तलाठी भरती

image 19

कोकण महसूल विभाग तलाठी भरती

image 20

एकूण तलाठी भरती नवीन मान्यता पदे

image 21

सदर शासन निर्णय, वित्त विभाग अनौ.सं.क्र.३९४/२०२१, व्यय-९, दि.६.१०.२०२१ व अनौ.सं.क्र.३३२/ आ.पु.क. दि.२०.६.२०२२ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक २०२२१२०७१७३६१२६०१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

NITIN NANDKISHOR KAREER

(डॉ. नितिन करीर)

अपर मुख्य सचिव

प्रत :-

यांचे सचिव राजभवन, मुंबई

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Google News Read Now
error: Content is protected !!