पुणे महानगरपालिका कार्यालयाअंतर्गत खालील अस्थायी पदावर ११ महिन्यांकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर पदे भरावयाची आहेत .
अ . हुद्दा शैक्षणिक अर्हता
मुलाणी
रुपये १७२०५ /
इ . ४ थी उत्तीर्ण
२५ अजा -३ , अज -२ , विजाअ -१ , भजब -१ , १ भजक -१ , इमाव -५ , ईडब्ल्यूएस -३ , खुला – ९
अटी :
१. वरील अनु . क्र . १ मधील पदांसाठी खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय जाहिरातीचे दिनांकास ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे . मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल असेल .
२. वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव असणे आवश्यक
. ३. सदरचे पद अत्यंत अस्थायी स्वरूपाचे आहे
. ४. सर्व पदांची नेमणूक असेसमेंट पद्धतीने करण्यात येतील .
५. उमेदवारांनी अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो , आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती व अनुभवाच्या मूळ सत्यप्रतीचा एक संच सादर करणे आवश्यक आहे .
६. अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची छायांकितप्रत जोडणे आवश्यक .
७. विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज , वय , शैक्षणिक अर्हता , गुणपत्रक , जातीचा दाखला , अनुभव इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्य प्रती | ( टू – कॉपी ) जोडले नसलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील .
८. निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून फक्त ११ महिन्यांकरिता नेमणूक दिली जाईल .
९ . वरील पद हे अस्थायी स्वरूपाचे असल्याने या पदावर कायमस्वरूपीची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही
. १०. वरील पदासाठी नियुक्त होणाऱ्या सेवकांना महानगरपालिकेच्या कत्तलखाना व | पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत काम करावयाचे असून सदर कामाचे स्वरूप ठरविण्याचे अधिकार मा . खातेप्रमुख यांना राहील .
११ . अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही .
१२. उमेदवारास नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा . महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत . याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही
. १३. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास , गैरवर्तन करताना आढळल्यास , दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी आपोआप रद्दबातल होईल . तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही | पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल .
१४. निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वी एक महिन्याचे | मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल व त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही . |
वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी दि . १२-०७-२०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेमध्ये आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित
कॅ . वडके सभागृह , आरोग्य कार्यालय , तिसरा मजला , पुणे महानगरपालिका , मुख्य इमारत , शिवाजीनगर , पुणे -०५ येथे सादर करावेत .
वेळेनंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत , याची नोंद | घ्यावी . सदरची जाहिरात ही www.pmc.gov.on या संकेतस्थळावर Recruitment या सदरात उपलब्ध आहे .
उमेदवाराने सादर करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयामार्फत वरील ठिकाणीच देण्यात येईल .