You are currently viewing आरोग्य विभाग भरती २०२३ साठी एवढे अर्ज आले?
🏥 Arogya Vibhag Health Department Recruitment 2023: Last Chance to Apply for 10,000 Posts! 🌟

आरोग्य विभाग भरती २०२३ साठी एवढे अर्ज आले?

  • Post category:Home

arogya vibhag bharti एकूण २ लाख 56 हजार अर्ज प्राप्त

मुंबई, दि. 27 : सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करून भरती करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत प्रयत्नरत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भरतीची प्रक्रिया सुरू झाली. याबाबत त्यांनी विविध बैठकाही घेतल्या. ही भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देशही दिले आहेत. तसेच याबाबत विभागाने कंपनी प्रतिनिधीसोबत नियतकालिक आढावा बैठक घेऊन भरती प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विभागातील रिक्त पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया गतीने पुढे सरकत आहे.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ मधील भरतीसाठी 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले आहेत.  गट ‘क’मधील एकूण 55 संवर्गातील 6 हजार 949 रिक्त पदे असून ‘ड’ गटातील 4 हजार 10 रिक्त पदे आहेत. अशाप्रकारे एकूण 10 हजार 949 पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात प्रसिद्धीस दिली. या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट ‘क’ मधील रिक्त पदांसाठी 1 लाख 42 हजार 206 आणि ‘ड’ गटातील रिक्त पदांकरीता 11 हजार 649 अर्जांचा समावेश आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे 8 परिमंडळ क्षेत्रात विभागलेली आहेत.

माहिती लिंक – Team DGIPR

Arogya Vibhag – आरोग्य विभाग मध्ये गट क साठी ६००० व गट ड साठी ४००० पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये गट क साठी विविध तांत्रिक संवर्गातील पदे आहेत. गट ड साठी वर्ग चार ची पदे १० वी पास वर भरली जात आहेत. Arogya Vibhag online application form १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत online करायचे आहेत.

जाहिरात क्रमांक – आरोग्य विभाग गट क व ड भरती २०२३

संवर्ग – गट क व ड

पात्रता – १० वी पास ते पदवी

पदांची माहिती – गट क व ड मधील तांत्रिक व अतांत्रिक

अर्ज फी – खुला प्रवर्ग १००० रु व राखीव प्रवर्ग ९०० रु

अधिकृत website – http://arogya.maharashtra.gov.in/

सविस्तर जाहिरात –

गट क जाहिरात

गट ड जाहिरात

online अर्ज – Apply Here

Arogya Vibhag Bharti Details

Arogya Vibhag Group D syllabusSee Syllabus
Arogya Vibhag Group C syllabusSee Syllabus
Arogya Vibhag Group D Bharti 2023Click here
Arogya Vibhag Akolaclick here
Arogya Vibhag LaturClick here
Arogya vibhag bharti 2023 AurangabadClick Here