पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) भरती २०२२ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम ( NTEP ) साठी एकत्रित मानधनावर कंञाटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत .
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक(STS) | शैक्षणिक अर्हता-कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण,१ वर्षाचा अनुभव मराठी ३० व इंग्रजी ४० प्रति मिनिट टायपिंग |
टि . बी . हेल्थ व्हिजीटर | एम . एस . डब्ल्यु कोर्स उतीर्ण |
PCMC अर्ज स्विकृती व थेट मुलाखती माहिती
अर्ज स्विकृती व थेट मुलाखती ठिकाण – प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह , चिंचवड या ठिकाणी मुलाखती आयोजित केलेल्या असुन उमेदवाराने विहित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे . मुलाखतीचा दिनांक अर्ज स्विकारण्याची वेळ दि . ०७/०६/२०२२ सकाळी १० ते ११
अर्जासोबत कागदपत्रे
१ ) वयाचा पुरावा २ ) पदवी / पदवीका प्रमाणपत्र ३ ) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४ ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ५ ) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र ( यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . ६ ) निवासी पुरावा ७ ) जातीचे प्रमाणपत्र ८ ) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो , स्वाक्षरी ( नमूद केलेल्या आकारमानामध्ये ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वरील भरती या सदरा मध्ये जाऊन अर्जाची प्रिंट काढून सदरचा अर्ज भरून मुलाखतीस उमेदवाराने स्वतः उपस्थित रहावयाचे आहे
महत्वाची माहिती
सदरची पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने प्रकल्पासाठी भरावयाची असुन सदर पदावरील उमेदवारांना प्रथम नियुक्ती ११ महिने कालावधीची देण्यात येईल व शासनाकडून याबाबत प्राप्त मार्गदर्शक सूचना लागू राहतील . कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहील . मुलाखत एकास पाच ( १ : ५ ) या प्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येईल . याकरिता उपरोक्त नमुद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदवार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील .
निवड प्रक्रिया
मुलाखत ( परिक्षा ) एकुण १०० गुणांची राहील . या मध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्हतेच्या शेवटच्या वर्षाच्या गुणानुसार जास्तीत जास्त ५० गुण देण्यात येतील . उमेदवाराचे पात्र शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाचे गुण ग्राहय धरले जातील . आ ) उमेदवारास ५० गुण पुढील प्रमाणे देय राहतील कौशल्य चाचणी- १० गुण ,विषय ज्ञान – १० गुण . अनुभव – १० गुण ( प्रत्येक वर्ष ०२ गुण ) व तोंडी मुलाखत – २० गुण
महत्वाच्या लिंक
PCMC official website | website |
PCMC Advertisement PDF | Advertisement PDF |
Telegram Channel for daily Job update | Telegram |